दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिन बालकाश्रम किंवा वृद्धाश्रम मध्ये साजरा करण्याचा विचार होता. लहानपणीची ठकठक बालमासिकाची आवड असल्यामुळे माझी श्री सूरज गांगुर्डे यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या मार्फत जीवन संवर्धन फाऊंडेशन च्या बालकाश्रमाबद्दल कळले. बालकाश्रमातील श्री स्वप्नील भोर यांच्याशी संपर्क करून मुलांना आवश्यक असलेल्या किराणा सामानाची यादी आणि इतर अन्नदान, दूध दान इत्यादींची यादी घेतली .
मन माझे ग्रुप वर जेव्हा ह्या जीवन संवर्धन मदत योजनेबद्दल पोस्ट करण्यात आली तेव्हा अल्पावधीतच खूपच छान प्रतिसाद मिळाला आणि मन माझे मधील आणि ठकठक मित्र परिवाराने खूप अनमोल सहकार्य केले त्यामुळेच हा उपक्रम अगदी अपेक्षेपेक्षाही जास्त छान प्रकारे पार पडला.
श्री सुनील खांडेकर आणि श्री किशोर गवळी यांच्या सहकार्याने आम्ही काही दिवस आधीच जाऊन सर्व किराणा सामानाची खरेदी केली आणि सर्व सामान आश्रमात ठेवून आलो. त्यावेळी आश्रमातील श्री अभ्यंकर काकांनी चांगली मदत केली आणि आश्रमाची एक छोटीशी भेट सुद्धा घेता आली. श्री स्वप्नील भोर यांनी खूप छान मार्गदर्शन केले , आणि वेळोवेळी फॉलो अप घेऊन सर्व मदत केली.
दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी आम्ही सर्व टिटवाळा स्टेशन वरून रिक्षा करून आश्रमात पोचलो, तिथे पाहतो तर मुलांची अभ्यासात पकड मजबूत व्हावी म्हणून आश्रमातर्फे शिकवणी सुरु होती. इतर मुले शाळेतून आल्यावर आम्ही झेंडावंदन कार्यक्रमाला सुरवात केली. खूप सुदर प्रकारे झेंडावंदन साजरा करण्यात आला. श्री श्याम परब यांनी आणलेला खाऊ मुलांना देण्यात आला. सर्वांसाठी नाश्ता देण्यात आला तेव्हा मुलांनी आधी ईश्वराचे नामस्मरण केले आणि मगच अन्न ग्रहण केले.
आश्रमाचे संस्थापक श्री सदाशिव चव्हाण यांनी बेघर मुलांच्या पुनर्वसनासाठी हि संस्था स्थापन केली होती आणि त्यांनी त्यांच्या कार्यांची, मुलांच्या समस्यांची आणि येणाऱ्या अडचणींची सर्व माहिती दिली. १२ वर्षे म्हणजे एक तपच त्यांनी हे समाज कार्य सुरु ठेवले आहे. त्यांच्या कार्याला मनापासून सलाम आहे. त्यांनतर सर्वाना झेंडा वाटप आणि मुलांशी संवाद साधून त्यांचे खूप छान मनोरंजन करण्यात आले.
मुलांसाठी काहीतरी वेगळा आणि छान उपक्रम करावा असा सल्ला श्री स्वप्नील भोर यांनी दिलेला. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. सर्व मुलांनी खूप उत्साहाने स्पर्धेत भाग घेतला आणि खूप छान छान चित्रे काढली. सुंदर चित्रे काढणाऱ्या विजेत्या मुलांना पारितोषिक देण्यात करण्यात आले, आणि काही मुलांना उत्तेजनार्थक पारितोषिके दिली.
बालकाश्रमाला 2 वेळचे अन्नदान, एक महिन्याचे दूधदान देणगी स्वरुपात देण्यात आले. आणि तेथील गोड आठवणी घेऊन आम्ही सर्वांचा निरोप घेतला.
मित्रानो तुम्ही सुद्धा एकवेळ टिटवाळा येथील जीवन संवर्धन फाऊंडेशन बालकाश्रमाला भेट द्या आणि एक मदतीचा हात पुढे करा हि नम्र विनंती 🙏🏻
ह्या उपक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या.सर्वांचे, विशेष करून मन माझे आणि ठकठक ग्रुप मधील मित्रांचे लक्ष लक्ष आभार 💐💐💐💐💐☺️
मन माझे ग्रुप मध्ये सामील होऊन तुम्हाला हि भविष्यात इतर उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर मला ९८६९२५७८०८ ह्या नंबर वर संपर्क करू शकता
तसेच मन माझेच्या फेसबुक ग्रुपला पुढील लिंक वर जॉईन होऊ शकता :
https://www.facebook.com/groups/mannmajhegroup
मन माझे सेवाभावी संस्थचे इतर उपक्रम ह्या ब्लॉग वर पाहू शकता
https://mannmajhetrust.blogspot.com
धन्यवाद
सचिन हळदणकर
Post a Comment