प्रिय मित्रानो,

आतापर्यंत आम्ही राबवलेल्या सर्व उपक्रमाला तुम्ही भरभरून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे शतशः ऋणी आहोत. 🙏🏻

यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' ग्रुप तर्फे आणखीन एक मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. १५ ऑगस्ट २०१७ रोजी वासींद जवळील, खाणीवली आदिवासी पाड्यातील शाळेतील पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांना भेट देऊन शालेय अभ्यासाचे साहित्य आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे.

या शाळेमध्ये 70 विद्यार्थी आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी
पुढील प्रमाणे आहे :

१. पेन सेट
२. दुरेघी वह्या
३. चौकट वह्या
४. १०० फळे
५. चोक्लेट्स
६. खोडरबर
७. शालेय पाट्या
८. पाटीवरच्या पेन्सिल चे बॉक्स
९. वहीवरच्या पेन्सिल चे बॉक्स
१०. चित्रकला वही
११. स्केचपेन्स
१२. रंगीत खडू बॉक्स
१३. स्कुल बॅग्स
१४. सचित्र बालमित्र पुस्तके
१५. जुनी किंवा नवीन गोष्टीची पुस्तके
१६. ४ किलो केक

तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना वस्तू रूपाने किंवा देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा

संपर्क:
सचिन हळदणकर : ( Central Line - 9869257808 )
संजय नायकवाडी : ( Central Line - 9819004049 )
धनाजी सुतार : ( Harbor Line - 9930092307 )
अरविंद गणवे ( Harbor Line - 9870595459 )
देवेन सकपाळ : ( Western Line - 9022260765)
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)

नोंद : जे सभासद भेट देण्यास उत्सुक आहेत त्यांनी
9869257808 या नंबर वर संपर्क साधावा. ट्रेनचे वेळापत्रक नंतर देण्यात
येईल , ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र, हिरवी किंवा भगवी वस्त्रे परिधान करावी.

धन्यवाद
टीम मन माझे

Post a Comment

 
Top