प्रिय मित्रानो

यंदा २६ जानेवारी २०१७ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' ग्रुपतर्फे तळोजा येथील परम शांतीधाम वृध्दाश्रम येथे भेट देऊन अन्न पुरवठा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, देणगी आणि भेटवस्तू दिल्या. या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी भरभरून सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत.

परम शांतीधाम वृध्दाश्रमाची स्थापना श्री परमपूज्य महायोगी गगनगिरी महाराजांचे शिष्य,  श्री परमपूज्य महामंडलेश्वर आबानंदगिरिजी महाराज यांनी केली. श्री अभय वाघ सर यांनी आम्हाला हा उपक्रम राबवण्यास तेथे परवानगी दिली याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून  आभार मानतो.

यावेळी आम्ही सर्व ज्येष्ट नागरिकांसाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम करायचं ठरव होत आणि त्यासाठी आम्ही आपल्या ग्रुपचे सभासद आणि उत्कृष्ट अभिनेता म्हणून कारकीर्द असलेले श्री योगेश पवार याना संपर्क साधला. आमच्या उपक्रमाबाबद्दल योगेश ने रंगभूमी वर खूप वर्षांचा अनुभव असलेले श्री देवेंद्र मदन केळुसकर सरांना सांगितल्यावर त्यांनी त्वरित होकार दिला.

 त्यांच्या ग्रुपने मिळून अत्यन्त उत्कृष्ट असा वाद्य वृंदाचा ओर्केस्टा सादर केला. ज्यामध्ये भक्तिगीते,भावगीत, जुन्या चित्रपटातील अप्रतिम गाणी आणि विनोदी नाटक सादर केलं. यावेळी एका आजोबानी सुंदर हिंदी गीत गायन सुद्धा केले  तसेच कार्यक्रमाच्या शेवटी  आजी आजोबानी गाण्याच्या ठेक्यावर आमच्यात सामील होऊन नाच सुद्धा केला. या सर्व सादरीकरणासाठी आणि वेळ काढून आल्याबद्दल आम्ही मन माझे ग्रुप कडून श्री. देवेंद्र मदन केळुसकर सर, श्री. योगेश पवार आणि त्यांच्या ग्रुपमधील सर्व गायकांचे, कलाकारांचे विशेष आभार मानतो.

या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुछ देऊन आभार मानण्यात आले आणि अर्ध्या तासाने ग्रुपतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः " हा मंत्र जपत सर्वांनी जेवण ताटात वाढून घेतल्यावरच एकत्र सर्वांनी भोजन सुरु केल आम्ही त्यांना भोजन वाढून आनद आणि थोडफार  पुण्य  मिळवायचा एक प्रयत्न केला.

भोजनानंतर ग्रुपतर्फे सर्व आणि आजी आजोबाना भेटवस्तू देण्यात आली आणि आम्ही सर्वानी त्यांचे आशीर्वाद घेतले. सर्वांची विचारपूस केली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद , समाधान पाहून मन सुखावले. खूप जण पुन्हा नक्की या भेटायला असे आवर्जून आम्हाला सांगत होते. शेवटी आपण त्यांना जितका वेळ देऊ तो वेळच कशाही पेक्षा जास्त अनमोल असतो.

म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून या आश्रमाला भेट द्या आणि जमल्यास मदत करावी हि नम्र विंनती करतो .


धन्यवाद
सचिन हळदणकर

 

Post a Comment

 
Top