प्रजासत्ताकदिनानिमित्त २६ जानेवारी  २०१५ आम्ही पुन्हा एकदा मुक्ता प्रकल्प बालिका भवन, टिटवाळा येथील मुलींसाठी मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आणि या ठिकाणी भेट देऊन तेथील लहान मुलीना 'मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' तर्फे आम्ही अन्न पुरवठा, देणगी आणि भेटवस्तू दिले.  


मुलासाठी आणलेला केक कापण्यात आला आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. योग आणि आरोग्य यावर सुंदर असे मार्गदर्शन श्री हर्षद नेरे  यांच्याकडून करण्यात आले.  मुलांमधील गुण वाढीस लागावे म्हणून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. खूप छान असे क्षण सर्वांनी व्यतीत केले. या योजनेला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !!  

Post a Comment

 
Top