प्रिय मित्रानो ..

            मन माझे तर्फे २४ जून २०१२ रोजी माई सिंधुताई सपकाळ संचालित संमती बालनिकेतन मदत योजना राबवण्यात आली , ज्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला ..त्याबद्दल मनापासून धन्यवाद  !! ...या आधी सुद्धा  १३ नोव्हेंबर २०११ रोजी टिटवाळा येथील मुक्त बालिका भवन येथे मदत योजना राबवण्यात आली..तसेच ९ जानेवारी २०१२ रोजी खार येथील सिनियर सिटीझन स्पेशल केयर युनिट येथे क्रीडा दिन साजरा करण्यात आला , गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०११ रोजी मन माझे तर्फे "तळोजा येथील परम शांतीधाम वृद्धाश्रम" मदत योजना राबवण्यात आली ..या सर्व योजनांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, सहकार्य केले त्याबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत !! 

            यंदा या वर्षी सुद्धा १५ ऑगस्ट २०१२ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त मन माझे तर्फे आम्ही एक उपक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. वासिंद येथील वेहळोली गावातील मुक्त जीवन सोसायटी येथील लहान मुलांच्या वस्तीगृहाला भेट देऊन तेथील चिमुकल्यांबरोबर आपला वेळ व्यतीत करून ,काही स्पर्धा भरवून त्यांना बक्षीस, भेटवस्तू आणि देणगी द्यायचे ठरविले आहे. येथील चिमुकली मुले हि दुर्देवाने HIV सारख्या दुर्दम्य आजाराच्या विळख्यात सापडलेली आहेत, या चिमुकल्यांना आपण आपल्या आयुष्यातील काही क्षण देवून , त्यांना थोडाफार आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहोत ..ज्यायोगे आपल्यामुळे त्यांच्या ओठांवर हसू उमलेल .. :)
          
       नव्या पिढीने हे ध्यानात त्यांना आवश्यक आधार देणे गरजेचे आहे. तरुण वर्ग ह्या कामी विशेष प्रयत्न करु शकतो व करत आहे. म्हणून आम्ही सुद्धा आमच्याकडून एक छोटस पाउल उचललेल आहे ..या वस्तीगृहात अंदाजे ६६ मुले आहेत, त्यांना चित्र काढण्यासाठी वह्या , रंग पेटी आणि इतर भेटवस्तू देण्याचा तसेच विविध स्पर्धा भरवून त्यांना बक्षीस देण्याचा , त्यांच्यातील कलागुण वाढवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करणार आहोत .. त्याला तुम्हा सर्वांचा योग्य प्रतिसाद लाभेल अशी आम्ही आशा करतो !!

            तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

सचिन हळदणकर : ९८६९२५७८०८ ( Central Line - 9869257808 )
धनाजी सुतार : ९९३००९२३०७ ( Harbor Line - 9930092307 )
देवेन सकपाळ : ९६१९६८६०६१ ( Western Line - 9619686069 )
रोहित वेलवंडे : ९८७०५८५८३१ ( Central Line - 9870585831)
प्रदीप रेळेकर ९९८७९२५२५७ ( Central Line - 9987925257)
अरविंद गणवे ९८७०५९५४५९ ( Harbor Line - 9870595459 )

           ज्या हितचिंतकांना भेटून शक्य नाही ते इंटरनेटद्वारे सुद्धा खालील अकाउंट वर देणगी पाठवू शकता.आपली विश्वासाने केलेली छोट्यात छोटी मदत सुद्धा समाज कार्यासाठी वापरली जाईल याची मन माझे तर्फे आपल्याला खात्री देण्यात येत आहे !!

Name: Sachin Haldankar
Account No. 005701556713
IFSC Code - ICIC0000057
MICR Code - 400229013
Bank - ICICI Bank Ltd.
Branch Name - MUMBAI - PRABHADEVI


आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

आभार
टिम मन माझे.....

Post a Comment

 
Top