२४ जुलै २०११, श्री स्वामी समर्थ मठ आणि पळसधरी वॉटरफॉल पिकनिक मन माझेच्या जुन्या आणि नवीन सभासदांनी अनुभवलेला एक आगळावेगळा अनुभव.
कित्येक दिवस वाट बघून एकदाचा तो दिवस उगवला. आम्हाला अपेक्षा पण नव्हती त्यापेक्षा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला तुम्ही दिलात. सकाळी ७.०० वाजल्यापासून जणू काही मन माझेच्याच सभासदांची वर्दळ दादर मध्ये चालू होती.
एक-एक म्हणता म्हणता संख्या वाढत गेली, आणि आम्ही पळसधरीला प्रयाण केले.
आम्ही पळसधरीला पोहोचतो तर काय, समोर पुणेकर आमच्या स्वागतासाठी आधीच ठान मांडून उभे होते, आणि सुरुवात झाली आमच्या पळसधरी पिकनिकला.
सगळे जण स्टेशनवर भेटले आणि आम्ही थेट, मस्त चीखलदार रस्त्यातून पायवाट काढत काढत....
छोटसं धरण पार करून घर गाठले...
गेल्यावर प्रथम "आधी विठोबा मग पोटोबा" या उक्तीनुसार पहिलं श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन त्यांच्या मनोहर रूपाचे दर्शन घेतलं,
मन अगदी प्रसन्न झाले
आणि परतून सर्वांनी पोहे आणि चहावर ताव मारला.
मग सर्वांना हुरहूर होती ती पळसधरी धबधबा गाठण्याची. मग आम्ही लगेचच निघालो ...
आमच्या स्वागतासाठी रिमझिम पावसानेही हजेरी लावलीच होती. मग काय , पावसातून पायवाट काढत काढत, डोंगरदर्यातील हिरवळ अनुभवत आम्ही धबधबा गाठला,
आणि सर्वांनी एकच धम्माल उडवून दिली.
मस्त संतत पावसाच्या धारा, आणि वरून फेसाळणारा धबधबा,
एक सुखद आनंद थट्टा-मस्करी करत आम्ही अनुभवला.
त्या ठिकाणाहून कोणालाही परतावं असं वाटत नव्हतं,
पण काय करणार, ते सगळे क्षण मनात साठवून आम्ही सर्वांनी तिथून काढता पाय घेतला....
पुन्हा गावाजवळील धरणावर आलो तिथे सुद्धा नदीमध्ये आणि छोट्याश्या ओढ्याखालील धबधब्याखाली मजा केली...
परतून सर्वांनी मस्त गरम जेवणावर ताव मारला,
आणि मग काही वेळाने त्याच आठवणी धूसर होत असताना आम्ही परतीच्या वाटेवर आलो.
खरच सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय सारखं सारखं,
तुम्ही सर्वांनी मन माझेला जो प्रतिसाद दिलात, जे आनंदाचे क्षण आमच्या सोबत घालवलात ते नेहमीच आमच्या स्मरणात राहतील. पिकनिक मध्ये सहभागी झालेल्या सर्व मुंबई-पुणे-पनवेल कर सभासदांचे मनापासून आभार.

Post a Comment