15 ऑगस्ट 2025 - स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वामी आधारवर्धिनी बालकाश्रम मदत योजना | मन माझे ग्रुप
प्रिय मित्रानो,
आतापर्यंत मन माझे ग्रुपकडुन ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत. 🙂🙏🏻💐
यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही स्वामी आधारवर्धिनी आश्रम मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. पालघर येथील स्वामी आधारवर्धिनी बालकाश्रमाला आपण भेट देणार आहोत. आपण या ठिकाणी अन्नदान, किराणा सामान, भेट वस्तू आणि देणगी द्यायचे ठरविले आहे.
प्रत्येक मुलाला त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. जगण्यासाठी, कमाई करण्यासाठी, कुटुंब वाढविण्यासाठी - आणि शक्य तितके आरामात त्यांचे जीवन जगण्यासाठी - मुलांना शिक्षणाच्या माध्यमांद्वारे मदत आणि मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
अपघात, दीर्घकालीन आजार किंवा गरिबीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले शिक्षणासह अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित राहतात. स्वामी आधारवर्धिनी संस्था जवळजवळ २९ मुलांना आधार देते. या मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी एक कुटुंब आणि आधार व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
स्वामी आधारवर्धिनीचे मुख्य उद्दिष्ट समाजातील गरीब, वंचित, अपंग मुलांसाठी तरतूद करणे आहे. त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना समाजाचे मार्ग समजून घेण्यासाठी आणि एक सभ्य, दयाळू आणि नम्र माणूस म्हणून वाढण्यासाठी स्वयंपूर्ण होण्यास मदत करणे.
या सर्वांसाठी तुमचा पाठिंबा आणि मदतीची आवश्यकता आहे. या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :
किराणा सामान:
तांदूळ - ३० किलो
गहू - २० किलो
गव्हाचे पीठ - १० किलो
चण्याचे पीठ - ५ किलो
तूरडाळ - ५ किलो
चणाडाळ - ५ किलो
मुगडाळ - ५ किलो
उडीद डाळ - २ किलो
मसूर डाळ - २ किलो
बारीक चणे - २ किलो
काबुली चणे - २ किलो
हिरवा वाटाणा - २ किलो
सफेद वाटाणा- २ किलो
काळा वाटाणा - २ किलो
मूग - २ किलो
मटकी- २ किलो
चवळी - २ किलो
वाल - २ किलो
राजमा - २ किलो
पोहे - ५ किलो
रवा - ३ किलो
लापशी - १ किलो
हळद - १ किलो
लाल तिखट - १ किलो
मसाला - १ किलो
जिरे - २५० ग्राम
राई - २५० ग्राम
धने - - २५० ग्राम
हिंग - १०० ग्राम
मीठ - २ किलो
साखर - ४ किलो
गूळ - २ किलो
साबुदाणा - २ किलो
शेंगदाणा - १ किलो
काजू - बदाम इत्यादी सुका मेवा - १ किलो
वेलची - १०० ग्राम
सूर्यफूल तेल - ५ लिटर
खोबरेल तेल - ५
तूप - १ किलो
सुके खोबरे - १ किलो
लोणचे - ३ किलो
पापड - १ किलो
बाथरूम फिनाईल - ३ लिटर
टॉयलेट क्लिनर - ३ लिटर
अंघोळीचे साबण
कपड्याचे साबण
भांडयाचे साबण
कोलगेट
शाम्पू
ब्रश
झाडू
बिस्कीट - २ बिग पॅकेट
फरसान / वेफर - ५ किलो
इतर वस्तू व मदत:
जुनी किंवा नवीन गोष्टीची पुस्तके
एक दिवसाचे अन्नदान - २५०० ₹
तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना सामील व्हायचे आहे किंवा मदत करावयाची आहे त्यांनी 9869257808 नंबर वर Gpay/Paytm द्वारे मदत पाठवू शकता.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत. 🙏🏻
आभार
मन माझे 💐🙏🏻
Post a Comment