प्रिय मित्रानो

          आतापर्यंत मन माझे तर्फे ज्या ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत.

यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही पारस बालभवन, टिटवाळा  येथील मुलांसाठी मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. पारस बालभवन हि समाजातील वंचीत आणि निराधार मुलांसाठी पुनर्विकास प्रकल्प राबवते. आपण या ठिकाणी भेट देऊन तेथील लहान  मुलांना 'मन माझे' तर्फे आम्ही अन्न पुरवठा, देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे. 

               अंदाजे ५० मुले या आश्रमामध्ये आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे. वस्तूंच प्रमाण कमीतकमी दिलेल आहे यापेक्षा जास्त प्रमाणात मदत ज्यांना शक्य आहे ते देवू शकतात.  

कडधान्य - 20  किलो 
पोहे  - 10 किलो
रवा - 8  किलो  
गव्हाचे पीठ  - 10  किलो  
जेवणासाठी तेल - 10 लिटर  
मॅगी - 5 मोठे पाकीट 
नुडल्स (खीर) - 5 पाकीट 
खारी टोस बटर - 10  पाकीट   
साखर - 5  किलो   
शेंगदाणे - 2  किलो    
बेसनपीठ - 5  किलो   
लसूण  - 3  किलो   
टूथपेस्ट  - 50
टूथब्रश - 50
चॉकलेट - 50
केसांचे तेल लहान बॉटल - 50
जुनी किंवा नवीन गोष्टीची पुस्तके , खेळणी आणि कपडे  
फेस पावडर डबे  -  50
फळे - 60  
2 किलो केक 
छोटे केक पॉकेट - 50 
अन्नदान - 5000 रुपये 
ऑफिस टेबल - 1


तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना मदत करावयाची आहे आणि ज्यांना सामील व्हायचं आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा. 

संपर्क:
सचिन हळदणकर : 9869257808 


नोंद : मर्यादित सदस्य नेण्यास परवानगी असल्याने, जे मदत आणणार असतील आणि योजनेला नक्की हजर असतील त्यांनी आगावू 9869257808 या नंबर वर कळवणे गरजेचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

आभार
मन माझे 
07 Jan 2020

Post a Comment

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top