प्रिय मित्रानो

        आतापर्यंत आम्ही ज्या ज्या मदत योजना राबवण्यात आल्या,  तुम्ही
सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा
सर्वांचे शतशः ऋणी आहोत.

यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही दोन मदत योजना हाती घ्यायचे ठरवले
आहे. रविवारी १४ ऑगस्ट रोजी मुक्ता बालिकाभवन, टिटवाळा आणि १५ ऑगस्ट रोजी
सत्कर्म बालकाश्रम, बदलापूर येथे भेट देऊन तेथील मुलांना 'मन माझे' ग्रुप तर्फे आम्ही अन्न पुरवठा, दैनंदिन गरजेच्या
वस्तू, देणगी
आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे.

              मुक्ता बालिकाभवन, टिटवाळा येथे अंदाजे ४५ मुली आणि ५
स्वयंसेविका या आश्रमामध्ये आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी
पुढील प्रमाणे आहे :

१. पेन सेट
२. सर्टिफिकेट फोल्डर
३. ८ लहान मुलींसाठी फ्रॉक
४. १०० फळे
५. ४५ चोक्लेट्स
६. तांदूळ
७. दाळ
८. गहू
९. बाजरी
१०. ज्वारी
११. ऑफिस रजिस्ट्रर वही (आडवी )  - ६
१२. फाईल्स - १२
१३. कॉम्प्युटर प्रिंटिंग पेपर सेट
१४. हार्पिक फिनाईल
१५. डेटॉल
१६. पायांची क्रॅक क्रीम

सत्कर्म बालकाश्रम बदलापूर येथे अंदाजे ३० मुले आहेत आणि या उपक्रमासाठी
लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :


१. मुलांसाठी सुका नाश्ता - टोस्ट ,खारी , बटर, फरसाण
२. पॉण्ड्स पावडर डबे
३. ३० चोक्लेट्स
४. जुनी गोष्टीची पुस्तके
५. ६० फळे
६. ३० अंघोळीचे  साबण
७. ३० कपडे धुण्याचे साबण
८. निरमा पावडर
९. फिनेल
१०. ३० भांडे धुण्याचे साबण
११. गरम मसाला किंवा गोडा मसाला  - १ किलो
१२. कडधान्य - २ किलो ( चवळी , चणे इत्यादी )
१३ .पापड
१४. चणा किंवा मसूर दाळ
१५. शेवया पाकीट

          तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी
ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची आहे
आणि ज्यांना सामील व्हायचं आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा (
प्रवासखर्च, नाश्ता जेवण ई.  स्वखर्च असेल याची नोंद घ्यावी ) :
संपर्क:
सचिन हळदणकर :  9869257808

नोंद : ट्रेनचे वेळापत्रक नंतर देण्यात येईल , ज्यांना शक्य आहे त्यांनी
शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

आभार
मन माझे
02 Aug 2016

Post a Comment

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top